तहसीलदार सुनील सावंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मोफत सातबारा वाटपाचा शुभारंभ
सिंदखेड राजा तिल 60 हजार 581 शेतकऱ्यांना मिळणार मोफत संगणकीकृत सातबारा
सिंदखेड राजा
- भगवान साळवे
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल स्वाक्षरी सातबाराचे राज्यात मोफत वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यानुसार सिंदखेड राजा तालुक्यातील 60 हजार581 शेतकऱ्यांना मोफत सातबाराचे वाटप करण्यात येणार असून आज गांधी जयंती जयंतीच्या दिनी तहसीलदार सुनील सावंत यांच्या हस्ते 10 गावातील शेतकऱ्यांना सातबारा वाटप करून मोफत सातबारा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला
भारत हा कृषिप्रधान देश असून आर्थिक प्रगतीमध्ये कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे महात्मा गांधी
यांच्या स्वराज्य संकल्पनेतून स्वातंत्र्य मध्ये शेती विकासाची आधारशीला होती चालू वर्षे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात येतआहे देशाच्या प्रगतीत शेतकऱ्यांचा मोठा वाटा असल्याने महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून शेतकऱ्यांना अद्यावत केलेल्या संगणिकृत डिजिटल सही असलेला सातबारा मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्याचाच भाग म्हणून तहसीलदार सुनील सावंत यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ तालुक्यातील आंबेवाडी, गारखेडा, नशिराबाद, नाईक नगर ,शेवगाव जहागीर, यासह10 विविध गावांमध्ये तहसीलदार स्वतः जाऊन त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मोफत सातबारा वाटप करण्यात आला यावेळी जि प सदस्य तथा माजी सभापती दिनकर बापू देशमुख ,बाजार समितीचे मुख्य संचालक प्रा मधुकर गव्हाड उपसभापती बद्री बोडखे,पस सदस्य संतोष आडे यांच्यासह संबंधित गावातील सरपंच , संबंधित विभागाचे मंडळ अधिकारी ,तलाठी तसेच गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी प्रत्येक घरोघरी जाऊन सातबारा वाटप करण्याचा मनोदय तहसीलदार सुनील सावंत यांनी व्यक्त केला