अखेर तो खड्डा वंचितच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून खड्डा बुजविला !
: शेगाव शहरातून जाणाऱ्या खामगाव- अकोट या राष्ट्रीय महामार्गावर दिवसांपासून शेगाव शहरातील एमएसईबी चौकातील पेव्हर ब्लॉक खचून त्याठिकाणी ही मोठा खड्डा पडलेला आहे. हा खड्डा रस्त्याच्या मधोमध असल्याने याठिकाणी दररोज अपघात होत आहे. असे असतांना भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा कडून दहा टोपले माती आणून हा खड्डा न बुजवता या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतीकात्मक स्मारक उभारून सदर खड्डा ४८ तासात बुजवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला होता. मात्र ४८ तास तर सोडा एक आठवडा उलटला तरी त्यांच्या इशाऱ्याची कुणीही दाखल घेतली नाही आणि तस कुठलाच आंदोलन हि केलं नसल्याने आज सोमवरी वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत हा खड्डा श्रमदानातून बुजविला…. : शेगाव शहरातून जाणाऱ्या खामगाव-बैतूल या राष्ट्रीय महामार्गावर शहरातील एमएसइबी चौकात या रस्त्यात मधोमध एक खड्डा पडलेला असून हा खड्डा बुजविण्यात यावा यासाठी मागील आठवड्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्टंटबाजी करीत एका दगडाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे स्मारक संबोधून त्याला पुष्पहार अर्पण करीत सदर खड्डा तात्काळ बुजविण्यात यावा अन्यथा 48 तासानंतर या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. यावेळी या कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी ही लाटली होती. मात्र प्रसिद्धी प्राप्त करून ही मंडळी दिलेला इशारा आणि पडलेल्या खड्ड्याला विसरून गेले. त्यामुळे येथे दररोज अपघाताचे प्रमाण वाढल्याने आज सोमवारी वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदानातून हा खड्डा बूजवीला आहे यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फक्त स्टंटबाजी केली का असा प्रश्न उपस्थित होत आहे.