मॉर्निंग वॉक करतांना झालेल्या अपघातातील गंभीर तिसऱ्या तरुणाचाही मृत्यू*

0
121

*मॉर्निंग वॉक करतांना झालेल्या अपघातातील गंभीर तिसऱ्या तरुणाचाही मृत्यू*

एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंब दुःखात

वाहनाचा थांगपत्ता लागेना घटनास्थळावर मिळाले इंडिकेटर

मलकापूर -मोताळा मार्गावरील डिडोळा फाट्याजवळ १ ऑक्टोबरला सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या तिघांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक देवून उडवले होते. या अपघातामध्ये दोघे जण जागीच ठार झालेले होते तर कमलेश शिवाजी जुनारे (वय-१९) रा.डिडोळा हा तरुण गंभीर जखमी झालेला होता. त्याचेवर औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु होते. परंतु ४ ऑक्टोबरचे सकाळी ५ वाजता त्याची प्राणज्योत मावळली. कमलेश जुनारे हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मलकापूर-बुलडाणा रोडवरील डिडोळा फाट्याजवळ १ ऑक्टोबरचे सकाळी अज्ञात वाहनाने सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या अमोल निनाजी गाढे (वय-२०) दिपक कायस्थ (वय-४०) या दोघांचा जागीच मृत्यू झालेला होता तर तिसराकमलेश शिवाजी जुनारे (वय- १९) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला प्रथम उपचारासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्याला औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. दोन दिवस उपचार झाल्यानंतर ४ ऑक्टोबरचे
सकाळी ५ वाजता त्याची प्राणज्योत मावलली. त्यांचा कुटुंबाचा एकमेव आधार गेला. हे दोन्ही तरुण दररोज सैन्य भरतीसाठी सराव करीत असत. परंतु अचानक त्यांचेवर काळाने घाला घालून तिन्ही जणांचा बळी घेतला. अपघातग्रस्त वाहनाचा अद्याप शोध लागलेला असून, पोलिस अपघातग्रस्त जागेवर मिळालेल्या इंडिकेटरवरून त्या वाहनाचा शोध घेत आहे.
—————————————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here