गारपीट आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्यशासनाच्या वतीने देण्यात येणारी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिलासा देणारी – खा.प्रतापराव जाधव
बुलडाणा (प्रतिनिधी) :
मार्च एप्रिल आणि मे मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या शेत पिकांच्या नुकसानी करीता तसेच जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत जमिनीच्या नुकसान भरपाई पोटी राज्य् शासनाच्या वतीने मदत जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रीया केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त् केली आहे.
बुलडाणा जिल्हयामध्ये मार्च, एप्रिल आणि मे या कालावधीमध्ये अनेक भागामध्ये गारपीट होवून शेतमालाचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त् शेतकऱ्यांना तात्काळ मदत दयावी अशा आशयाचे निवदेन केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्यासह कृषी आणि पुनर्वसन मंत्रालयाकडे केली होती. त्यानुसार जिल्हयाला अमरावती विभागातुन 10 कोटी 13 लक्ष रुपयाची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. तसेच जुलै मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुर परिस्थीतीमुळे शेतपिकांचे झालेले नुकसान पोटी राज्य् आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार बुलडाणा जिल्हयाला 37.00 लाख रुपयांना निधी राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे. यासंदर्भात परिपत्रक राज्यसरकारच्या वतीने निर्गमीत करण्यात आले आहे. ही नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. शेतकरी वर्ग सध्या आर्थिक विंवचनेत असतांना राज्यसकारच्या वतीने शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली मदत ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे अशी प्रतिक्रिया खासदार प्रतापराव जाधव यांनी व्य्क्त करुन मुख्यंमत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे आभार मानले आहेत.