- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिशादर्शक फलकावर जाहिराती लावणाऱ्या विरुद्ध कारवाई करा आम आदमी पार्टी
बुलढाणा शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दिशादर्शक फलकावर वाढदिवस आणि जंगी स्वागत स्वरूपाचे फलक लावण्यात येत असल्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे यासंदर्भात संबंधितांवर कारवाई करावी अशा आशयाची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे
यासंदर्भात निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह , सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटन मंत्री अँण्ड दिपक मापारी यांनी दिला आहे यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की बुलढाणा शहरातील त्रिशरण चौक ,मलकापूर रोड ,आणि अजिंठा रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिशादर्शक कमानी उभारण्यात आल्या आहेत परंतु या दिशादर्शक कमानींवर सध्या राजकीय पुढारी व इतरांच्या वाढदिवसाच्या संदर्भातील जाहिराती लावण्यात येत आहे त्यामुळे महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्ता हुलकावणी देऊन त्यांची दिशाभूल होत आहे याशिवाय अपघातांची शक्यताही नाकारता येत नसल्याने या दिशादर्शक फलकावर जाहिरात लावणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले निवेदनावर आम आदमी पार्टीचे प्रशांत मोरे अँण्ड अमित दाभाडे सुनील मोरे इरफान शेख यांच्यासह आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत ….