आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध तहसीलदार
सिंदखेड राजा
ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता अनेक संकटे अंगावर झेलून सैनिक आपल्या जिवाची पर्वा न करता सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावतात त्यामुळे आपण आणि आपला देश सुरक्षित आहे त्यामुळे सैनिका प्रति आपल्या मनात सर्वोच्च मानसन्मान असल्याने आपIण आजी मजी सैनिक त्यांच्या विधवा पत्नी आणि त्यांच्या कुटुंबाच्या असलेल्या शासन दरबाराच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन तहसीलदार सुनील सावंत यांनी केले
सैनिक कल्याण विभागाच्या वतीने सिंदखेड राजा येथे जिजामाता सभागृहात आजी मजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाच्या समस्या सोडविण्यासाठी सैनिक मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार सुनील सावंत बोलत होते यावेळी सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर वाघ यांनी बोलताना सैनिकांना ग्रामपंचायत कार्यालयात यासह नगरपालिका ,पंचायत समिती, पोलीस स्टेशन ,तहसील कार्यालयात माजी सैनिक त्यांचे कुटुंब यांना आपले कामे मार्गी लावण्यासाठी आपले काम करून घेताना अनेक अडचणी येतात त्याठिकाणी संबंधित विभाग मदत करत नाही यासह विविध अडचणी येतात याबद्दल असलेल्या समस्यांची माहिती दिली या सर्व समस्या ऐकून तहसीलदार सुनील सावंत यांनी आपण सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून सैनिकांचे प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावू अशी ग्वाही दिली जर काही कोणत्या विभागाच्या संबंधित सैनिकाच्या अडचणी असेल तर त्यांनी निसंकोचपणे माझ्याशी थेट संपर्क साधावा त्यांच्या समस्याचा तात्काळ निपटारा करण्यात येईल याची खात्री दिली यावेळी या मेळाव्यासाठी पोलीस स्टेशनच्या वतीने साहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे पंचायत समितीच्या वतीने अंकुश मस्के पालिकेच्या वतीने अधीक्षक नेमाडे तर सैनिक कल्याण समिती तालुका अध्यक्ष सुभेदार द्वारकादास म्हस्के उपाध्यक्ष फकीरा जाधव बाबुराव खरात यांच्यासह अनेक माजी सैनिक त्यांचे कुटुंब या सैनिक मेळाव्याला उपस्थित होते