श्रीराम’ मुळे वाचले ‘ गजानन’ चे प्राण; सावळा येथील थरार

0
132

साखरझोपेत असताना आले’ शिट्टी’ चे आवाज! डोळे उघडून पाहिले तर समोर मृत्यू देवता डोलत होती!! ‘श्रीराम’ मुळे वाचले ‘ गजानन’ चे प्राण; सावळा येथील थरार


बुलडाणा (  प्रतिनिधी) पहाटेच्या साखरझोपेत पलंगावर गाढ झोपले असताना कुकरच्या शिट्टी सारख्या आवाजाने ‘त्यांना’ जाग आली अन डोळे चोळत खाली बघतो तर काय समोर जणू काही काळ डोलतोय ! यामुळे पाचावर धारण बसली असताना त्यांनी हिंमत करून फोनाफोनी सुरू केली. या प्रसंगावधान व हिंमत मुळे त्यांचे प्राण वाचले…*
बुलडाणा नजीकच्या अन दाट जंगलांनी वेढलेल्या सावळा गावात हा थरार रंगला अन संबंधित कुटुंबासह गावकऱ्यांची तारांबळ उडाली! मात्र देवदूतासारख्या धावून आलेल्यानी त्यांना भयमुक्त केले! गावातील गजानन रायकर हे आपल्या घरी पहाटेच्या साखरझोपेत मग्न होते. नेमके पलंग जवळ कुकरच्या शिटीसारख्या आवाजाने त्यांची निद्राभंग झाली. ही भानगड आहे तरी काय हे पाहायला त्यांनी आळस झटकत डोळे उघडून पाहिले तो समोर भलामोठा साप डोलत फुत्कार मारीत असल्याचे त्यांना दिसले! त्यामुळे पाच गेले अन 2 राहिले अशी त्यांची गत झाली. काही क्षणाने भानावर आल्यावर त्यांनी सेनेचे लखन गाडेकर यांना फोन करून ही आपबीती सांगितली. त्यांनी सर्पमित्र श्रीराम रसाळ यांचा फोन लावला अन ते निखिल बेंडवाल सह रायकराच्या घरी दाखल झाले. त्यांनी आपले कौशल्य अन अनुभव पणाला लावून अत्यंत चपळ व विषारी असलेल्या घोणस जातीच्या सापाला पकडून बरनिबंद केले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here