मेहकर नजीक एसटी बस चा अपघात.

0
291

मेहकर नजीक एसटी बस चा अपघात.


..

सुदैवाने जीवित हानी टळली…

13 प्रवासी यामध्ये किरकोळ जखमी


मेहकर

मेहकर आगाराची मेहकर ते खामगाव
बस मेहकर नजिक रोडच्या खाली गेल्याने, अनेक प्रवासी जखमी.. स्थानिक लोकांच्या मदतीने, उपचारासाठी मेहकर येथील शासकीय रुग्णालय मध्ये भरती करण्यात आले.
हकीकत अशी की खामगाव वरून मेहकर कडे येत असलेली बस क्रमांक एम एच 12 ई.एफ.6931 ही मेहकर नजीक वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला व बस रोडच्या कडेला गेली यामुळे या बसमध्ये तब्बल 35 प्रवासी बसले होते तर एकूण 13 प्रवासी यामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत पण एकंदरीत बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बसचा वेग इतका होता व दोन-तीन वेळेस रस्त्याने अपघात होतो की काय अशीच काहीशी कल्पना बसलेल्या प्रवाशांना येत होती आणि तोच समोर येत नाही तर ही बस रस्त्याच्या कडेला उतरल्याने चालकाने सदर वाहन वेगात चालवण्याचे बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनी सांगितले. सदर मेहकर खामगाव बस साठी चालक म्हणून पि.टी. गडकरी होते तर वाहक म्हणून जे. एम.गावडे होते.
तर मेहकर नजीक अपघात झालेला असतानासुद्धा तब्बल पाऊण तास कोणतेही एसटी बस तेथे डेपो मॅनेजर नी संबंधित प्रवाशांना तातडीने बाहेर व दवाखान्यांमध्ये नेण्यासाठी पाठवली नाही यावरून त्यांचा हलगर्जीपणा लक्षात आल्याने येथील नागरिक संतप्त झाले होते या वेळेला काही नागरिकांनी रोडवर जाणाऱ्या खाजगी वाहनांच्या माध्यमातून संबंधित प्रवाशांना सरकारी दवाखाना मध्ये नेले एकंदरीत यामध्ये संपूर्ण एसटी चालकाचा व जाणीवपूर्वक प्रवाशांचा जीव धोक्यात असताना सुद्धा त्या ठिकाणी उशिरा दाखल झालेल्या डेपो मॅनेजर व सर्व कर्मचाऱ्यांचा असल्याचे या निदर्शने वरून दिसून आले सुदैवाने या अपघातांमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही एवढ मात्र बरं..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here