स्वच्छ भारत आभियानार्तगत काढण्यात आली स्वच्छता सायकल रॅली ….

0
92

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता,आणि पर्यावरण संतुलनासाठी प्लास्टिक बंदी संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून सायकल रॅलीचे आयोजन 25 ऑक्टोंबरला बुलढाणा येथे करण्यात आले होते

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आवारातून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनीषा पवार व उपाध्यक्ष कमलताई बुधवत यांनी संयुक्तरित्या हिरवी झेंडी दाखवली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी भाग्यश्री विसपुते जिल्हा परिषदेच्या विषय समितीचे सभापती तसेच कर्मचारी आणि विद्यार्थी या जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झाले होते शौचालयाचा नियमित वापर करेल स्वच्छता सर्वेक्षणमध्ये सहभागी होईल प्लास्टिक बंदी नियमांचं पालन करेल या संदर्भातील फलक जनजागृती रॅलीतील विद्यार्थ्यांच्या सायकलवर दिसून आले या रॅलीच्या माध्यमातून महिनाभर स्वच्छता आणि प्लास्टिक बंदी संदर्भात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी चंदनसिंग राजपूत यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here