- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात
बुलडाणा
सोयाबीनला 8 हजार रुपये आणि कापसाला 12 हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेआहेत
विदर्भ मराठवाडा आणि खान्देशातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 17 नोव्हेंबर पासून नागपूर येथील संविधान चौकात त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती रात्री 11 वाजता नागपूर पोलिसांनी त्याना ताब्यात घेतलं व बुलढाणा येथील त्यांच्या निवासस्थानी आज सकाळी 18 नोव्हेंबरला आणून सोडल- पोलिसांनी त्यांना घरी सोडल्यानंतर त्यांनी त्यांच्या निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली व त्यानंतर ते आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आंदोलनाला बसले आहेत कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलय….