गळफासाने महिलेचा मृत्यू : विवाहितेला ठार मारल्याचा नातेवाईकांचा आरोप… पतीसह पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल
शेगाव प्रतिनिधी
गळफास लागलेल्या स्थितीत विवाहितेला एका खाजगी रुग्नालयात दाखल करण्यात आल्या नंतर रात्री सदर महिलेची उपचार दरम्यान प्राण ज्योत मालवली. सादर महिलेच्या अंगावर मारहाण झाल्याचे व्रण आढळून आल्याने विवाहितेची सासरकडील लोकांनी हत्या केल्याचा आरोप मृतक महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी खामगाव पोलिसात पतीसह पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी सध्या फरार आहेत. सौ. श्रध्दा गजानन वैतकार वय २४ राहणार गोपाळनगर खामगाव असे मृत विवाहितेची नाव असून सदर विवाहितेला सासरकडील मंडळी कार घेण्यासाठी महेरवरून दोन लाख आणण्यासाठी तगादा लावीत होते. व यासाठी पतीसह सासरची मंडळी शारिरीक व मानसिक छळ करीत होते. दरम्यान
सदर विवाहितेता हि २५ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. तिला नातेवाईकांनी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. दरम्यान उपचार सुरु असतांना काल ३० नोव्हेंबर रोजी रात्री तिचा मृत्यू झाला, याबाबत मृतक विवाहितेचे बडिल भानुदास मोतीराम काळींगे (५५) रा. खंडाळा बाळापूर यांनी आज शिवाजी नगर पोस्टेला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विवाहितेचा पती गजानन रामदास वैतकार, सासरा रामदास वैतकार, सासू सौ. उषा बैतकार, नणंद सौ. दीपा प्रभाकर पातोंड व प्रभाकर पातोंड यांचेविरुध्द कलम ४९८अ ३०४, ३२३५०४.३४ भादंबिनुसार गुन्हा दाखल केला.