अप्पर पोलीस अधीक्षकची कारवाई गुटखा जप्त = गुटखा माफीयामध्ये खळबळ ?
शेगाव : खामगांव मध्यप्रदेश मधून शेगांव कडे गुटख्याची छुप्या मार्गाने वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने खामगाव अप्पर पोलिस अधिक्षक श्रवण दत्त यांनी शुक्रवार ३ डिसेंबर रोजी रात्री उशिरा कारवाई करीत गुटख्यासह २ लाख २६ हजार पाचशे २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई खामगांव एम.आय.डी.सी. चौफुलीवर करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील भागांमध्ये गुटखा माफियाविरोधात दररोज सुरु असलेल्या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
: महाराष्ट्रामध्ये गुटख्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. असे असतांना मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची विक्री होत असल्याने गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्या गुटखा माफियावर कठोर कारवाई करण्याचे आदेश शासनाकडून पोलिस प्रशासनाला मिळालेले आहेत. मात्र या आदेशाची अमलबजावणी फक्त जिल्ह्यातील खामगाव उपविभागातील अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्याच कार्यक्षेत्रातील गुटखा माफियांना उध्वस्त करण्याचे काम सध्या जोरात सुरु असल्याचे दिसून येते. मानवी आरोग्यास खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना मध्यप्रदेश वरून शेगावकडे शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास अपयकरारक असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असलायची गुप्त माहिती मिळाली यावरून शुक्रवारी रात्री खामगाव- नांदुरा मार्गावर एमआयडीसी जवळ सापळा रचण्यात आला. यात शेगाव कडे जाणाऱ्या एम एच २८ बी २७०९ या कारला थांबवून तपासणी केली असता कार मध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू असा १ लाख १४ हजार २० रूपयाचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला. यात शेगांव येथील मोहम्मद फारुख मोहम्मद शफी मो. वय ३० यास अटक करण्यात आली.. यावेळी पोलीसांनी गुटखा व कार सह २ लाख २६ हजार ५२० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.