बुलडाणा जिल्ह्यात धावली पहिली लालपरी, चोख पोलीस बंदोबस्तात बस आगारातून बाहेर…

0
189

बुलडाणा जिल्ह्यात धावली पहिली लालपरी, चोख पोलीस बंदोबस्तात बस आगारातून बाहेर…

बुलडाणा – चिखली मार्गावर दुपारी दीड वाजता च्या सुमारास धावली पहिली बस…

लाईन मन आणि चेकर ने बस काढली रस्त्यावर, कर्मचारी आंदोलनावर ठाम…

महिनाभरा पेक्षाही जास्त दिवस झालेत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने लालपरी ची चाके पूर्णपणे ठप्प झालेली आहेत, आणि अजूनही मागण्यांसंदर्भात योग्य तो निर्णय झाला नसल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत, मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बस रस्त्यावर येत असून आज अनेक दिवसानंतर बुलडाणा आगारातून पहिली बस ही रस्त्यावर धावली आहे….

मात्र यावेळी बस मध्ये अधिकृत चालक व वाहक कार्यरत नसून चेकर आणि लाईनमन या कर्मचाऱ्यांनी ही बस बाहेर काढली आहे,
आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचा रोष पाहता बसची तोडफोड किंवा काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी बुलडाणा बस स्थानकांमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता, आणि या बंदोबस्तामध्ये पहिली बुलडाणा – चिखली बस ही बसस्थानकाच्या बाहेर काढण्यात आली, आणि ही बस चिखली पर्यंत पोलीस बंदोबस्तात नेण्यात आली, एसटी कामगार अजूनही त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत, तर दुसरीकडे अधिकारी इतर कर्मचाऱ्यांचा आधार घेत बस रस्त्यावर काढत आहेत, त्याचा विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य प्रवाशांना फायदा तर होनारच आहे, मात्र आंदोलन कर्मचारी आता नेमका काय पवित्रा घेतात आणि आंदोलनाला काय वळण मिळतं ते पहाणे महत्त्वाचं असणार आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here