गावठी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या तिघांना बुलढाणा पोलिसांनी केले जेरबंद ४ पिस्तुलांसह १६ जिवंत काडतुसे जप्त*
Anchor : मध्यप्रदेशातून जिल्ह्यात शस्त्र विक्रीसाठी आलेल्या दोघांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संग्रामपूर तालुक्यातील वसाडी गावात पकडले. त्यांच्याकडून ३ देशी पिस्तुल व सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तर खामगाव शहरात आलेल्या एकाला शहर पोलीसांनी १ देशी बनावटीच्या पिस्तुलसह ६ जिवंत काडतुसे जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली.
: मध्यप्रदेशातून दोन जण गावठी पिस्तुल विकण्यासाठी वसाडी येथे आल्याची गोपनीय माहिती बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका मिळाली होती. त्यानुसार एलसीबी पथकाने वसाडी येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसे व एक मोबाईल असा एकूण ७६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सीताराम मोतीराम भिलाले (वय २३) व हिरचंद भुवनसिंग भिलाले (वय २२, दोघे रा. पाचोरी, ता. खकणार, जि. बुऱ्हाणपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर खामगाव शहरातील घटनास्थळ बाळापूर नाका भागात गुरुवारी सायंकाळी एक व्यक्ती देशी बनावटीची पिस्तूल विकण्यासाठी आल्याची माहिती खामगाव शहर पोलिसांना मिळाल्यावरून सापळा रचून यशपालसिंग करतालसिंग जुनी वय 22 रा निमखेडी ता संग्रामपूर याला ताब्यात घेतले त्याचे कडून १ देशी पिस्तुल आणि १० काडतुस जप्त करण्यात आली.