बुलडणा जिल्ह्यात 97.82 टक्के मतदान…359 मतदारांनी बजाविला मतदानाचा हक्क

0
98

अकोला बुलडाणा आणि वाशिम विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूकीसाठी
बुलडणा जिल्ह्यात 97.82 टक्के मतदान*
• मतदान सर्वत्र शांततेत
• 11 मतदान केंद्रांवर मतदान
• 359 मतदारांनी बजाविला मतदानाचा हक्क


An विधानपरिषदेच्या अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूकीकरीता आज 10 डिसेंबर रोजी मतदान पार पडले. मतदान सर्वत्र शांततेत झाले. या निवडणूकीसाठी जिल्ह्यात 11 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्रावरती आज सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यात एकूण स्थानिक प्राधिकारी पुरूष मतदार 169 व स्त्री मतदार 198 आहेत. एकूण मतदार जिल्ह्यात 367 आहेत. त्यापैकी 165 पुरूष मतदारांनी, तर 194 स्त्री मतदारांनी मतदान केले आहे. अशाप्रकारे एकूण 359 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतदानाची टक्केवारी 97.82 आहे.तसेच जिल्ह्यात निवडणूकीसाठी एकूण मतदार 367 आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here