राष्ट्रीय लोकअदालतील प्रकरणाचा तडजोडी ने निपटारा

0
77

राष्ट्रीय लोकअदालतील प्रकरणाचा तडजोडी ने निपटारा

बुलडाणा : राष्ट्रीय आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे निर्देशित केल्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील न्यायालयामध्ये लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतमध्ये मोटार अपघाताची प्रकरणे, धनादेश अनादरीत झाल्याची, वैवाहिक वाद, भू-संपादन, तडजोडयुक्त दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक न्यायालय, सहकार, औद्योगिक तसेच कामागार न्यायालयातील प्रलंबित तडजोडयुक्त प्रकरणे ठेवण्यात आली होती.


: शेगाव न्यायालयात शनिवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अडीच हजार दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. या वेळी सर्वात जुने प्रलंबित दावे निकाली काढण्यावर भर दिल्या गेले. देशातील सर्व न्यायालयात एकाच वेळी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये दिवाणी, फौजदारी, धनादेश न वटलेली, दाखलपूर्व, विविध कंपन्या, बँका, कौटुंबिक दावे, कामगार, आद्योगिक, सहकार, धर्मादाय आयुक्त यांच्याकडील जवळजवळअडीच हजार प्रकरणे तडजोडीसठी ठेवण्यात आली होती. जिल्ह्य़ात सध्या तीन लाखांपेक्षा जास्त खटले प्रलंबित आहेत. प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या वेळच्या लोकअदालतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला गेला. गाव स्तरावर तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यासोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. दिवाणी न्यायधीश घाडगे आणि सह दिवाणी न्यायधीश सावळे यांनी मार्गदर्शखाली वकील संघाचे अध्यक्ष अड मनोज मल तसेच सर्व न्यायीक अधिकारी, वकील संघाचे सर्व सदस्य, न्यायालयातील कर्मचारी, शासकीय अधिकारी आणि बँकांच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here