- गावकऱ्यांनी धान्याचे वाहन दिले पोलिसांच्या ताब्यात…
रेशनचे धान्य काळ्याबाजारात जात असल्याचा गावकऱ्यांना संशय…
देऊळगाव साकर्शा येथील 19 गव्हाचे कट्टे केली जप्त…
बुलडाणा जिल्ह्यात गोर गरिबांच्या धान्यावर डल्ला मारणारे राशन माफिया मोठ्या प्रमाणात काळाबाजार करत असल्याच्या घटना समोर येत आहेत, आणि आज परत रेशन चे धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी हे वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे…
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथून रेशनचे धान्य काळ्याबाजारात विक्री साठी जात असल्याची गोपनीय माहिती सरपंच संदीप अल्हाट यांना मिळाली, त्यावरून त्यांनी गावातीलच मालवाहू पिकप हे बस स्थानकावर अडवून चालकाची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, या वाहनांमध्ये 17 कट्टे गहू आढळून आले आहे..
, हा गहू रेशनचा असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त करत, पुरवठा विभागाला माहिती दिली, त्यावरून तालुका पुरवठा अधिकारी टेकाडे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत धान्यासह वाहन जानेफळ पोलीस ठाण्यात जमा केले… हे धान्य रेशनचे आहे की खाजगी या संदर्भात पुरवठा विभाग चौकशी करत आहे…