कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा शिवसैनिकांनी जाळला पुतळा
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून निषेध
बुलडाणा : कर्नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. आज बुलढाणा आणि शेगावात उमटले शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटकातील त्या घटनेचा निषेध करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतिमा जाळल्या…
: तीन दिवसापूर्वी बेळगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे. या घटनेचे बेळगाव सह महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आज बुलढाणा शिवसेना जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत तालुकाप्रमुख लखन गाडेकर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा येथील शिवसेना कार्यालयासमोर पुतळा जाळून निषेध नोंदविला
तर शेगावात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शांताराम दाणे, उपजिल्हा प्रमुख संतोष लिप्ते, शहर प्रमुख संतोष घाटोळ यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला.