विदर्भातील एकमेव, सुजज्ज असे क्षय रुग्णालय बुलडाणा ..

0
255

विदर्भातील एकमेव, सुजज्ज असे क्षय रुग्णालय बुलडाण्यात…

अत्याधुनिक सोयीसुविधा असल्याने राज्यभरातील रुग्ण घेतायत उपचार…

राज्यभरातील चार रुग्णालयापैकी बुलडाणा आरोग्यधाम प्रसिद्ध…

खासगी रुग्णालयांच्या तुलनेत सरकारी रुग्णालयांचा दर्जा खालावलेला असल्याची नेहमीच ओरड केली जाते, मात्र बुलडाणा जिल्ह्यातील क्षय रुग्णांसाठी असलेले आरोग्यधाम हे सर्व सुविधांनी परिपूर्ण असल्याने, राज्यभरातील रुग्ण या ठिकाणी उपचार घेतायेत, राज्यात केवळ असे चार रुग्णालय असून त्यापैकी बुलडाणा रुग्णालय प्रसिद्ध असल्याने रुग्णांचा या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कल पाहायला मिळतोय…

1954 साली पंडित कानडे शास्त्री यांनी आपल्या मालकीची 27 एकर जागा रुग्णालयाला दान दिली, आणि या संपूर्ण 27 एकराच्या परिसरामध्ये रुग्णालय विस्तारलेले आहे… राज्यभरात अशी क्षय रुग्णालय चार आहेत, यामध्ये पुणे जिल्ह्यातील औंध, अमरावती, कोल्हापूर आणि बुलडाणा, मात्र या चार पैकी विदर्भातच नव्हे राज्यात बुलडाण्यातील आरोग्यधाम याची ख्याती आहे, रुग्णालयाचा 27 एकराचा हा निसर्गरम्य परिसर, अत्याधुनिक उपकरणे, डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची परिपूर्ण असलेली पदे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या एकाच रुग्णालयात टीबी संदर्भात सर्वच चाचण्या, उपचार त्याचबरोबर दोन वेळचे जेवण, अंडी, दूध असा सर्व आहार या ठिकाणी निशुल्क पद्धतीने पुरवले जातो… त्यामुळेच या रुग्णालयात राज्यभरातील रुग्णांचा कल असतो, आणि आजपर्यंत लाखो टीबी चे रुग्ण याठिकाणी उपचार घेऊन बरे झालेत…

या आरोग्यधाम मध्ये एकूण चार वार्ड आहेत, ज्यामध्ये MDR टीबी, एक पुरुष आणि एक स्त्री असे स्वतंत्र वार्ड आहेत, ज्यामध्ये क्षय रुग्णांचे निदान करून त्यांच्यावर उपचार केला जातो, आणि क्षय रोग विषाणूचे रुग्णाच्या शरीरातून समूळ उच्चाटन होईपर्यंत, जास्तीत जास्त दिवस या रुग्णाला भरती ठेवून, उपचार देण्यावरच डॉक्टरांचा आग्रह असतो, त्यामुळे क्षय रोगांचा इतरांना संसर्ग होण्यास नक्कीच आळा बसतो…

एकाच छताखाली अत्याधुनिक उपकरणामार्फत चाचणी पासून उपचार आणि आहार ही सर्व याचठिकानी निशुल्क आणि उत्तम दर्जाचे मिळत असल्याने, राज्यभरातील रुग्ण याच बुलडाण्याच्या आरोग्य धाम मध्ये उपचार घेण्याला पसंती दाखवतायेत… कोरोणाच्या काळामध्ये या ठिकाणी 100 खाटांचे कोविड रुग्णाला देखील उभारण्यात आले होते, मात्र आता कोरोणाचे रुग्ण कमी होत असल्याने, पुन्हा एकदा क्षय रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत… आज रोजी 17 रुग्णांवर या ठिकाणी उपचार सुरू आहेत… तर दोन रुग्ण बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आलाय..

अनेकदा शासकीय रुग्णालयाची दुरावस्था आणि सुसज्ज उपकरणांचा अभाव पाहता, रुग्णांना क्षयरोगाची लक्षणे असताना देखील, आपली चाचणी करून उपचार करून घेताना दिसत नाहीत, मात्र बुलडाण्यात सर्व सोयीयुक्त अत्याधुनिक असे आरोग्यधाम असल्याने रुग्णांनी क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास तात्काळ आपली चाचणी करून उपचार करावा आणि क्षयरोगाचा प्रादुर्भाव टाळावा, असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात येत आहे…

या रुग्णालयातील सोयी सुविधेसह डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य तत्परतेमुळे शासकीय रुग्णालयांचा दर्जा ढासळला आहे, या विचाराला हे बुलडाणा क्षयरोग आरोग्यधाम एक खणखणीत चपराकच म्हणावी लागेल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here