133 कोटी 22 लाखाच्या पाणी पुरवठा कामांना निधी मंजुर

0
49

133 कोटी 22 लाखाच्या पाणी पुरवठा कामांना निधी मंजुर ….

बुलडाणा प्रतिनिधी :
शेगाव तालुक्यातील चिंचोली 30 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसह जिल्हयातील रखडलेल्या पाणी पुरवठयाच्या अन्य् योजनांना आज अखेर हिरवी झेंडी मिळाली आहे. एवढेच नव्हे तर तब्ब्ल 133 कोटी 22 लाखाच्या निधीस प्रशासकीय मान्य्ता देखील देण्यात आली आहे. केंद्रिय ग्रामविकास समितीचे अध्य्क्ष तथा जिल्हयाचे भूमीपूत्र शिवसेनेचे लोकप्रीय खासदार प्रतापराव जाधव, आ.डॉ.संजय रायमुलकर, आ.संजय गायकवाड यांच्या पाठपुराव्याचे हे यश असुन परिसरातील माय माऊल्यांच्या डोक्यावरील हंडा यामुळे उतरणार आहे. मुंबई येथे मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पर्यटन मंत्री आदित्य् ठाकरे हे आभासी पध्दृतीने (व्ही.सी.) उपस्थीत होते. पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील, खा.प्रतापराव जाधव,रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे, पंचायत राज समितीचे प्रमुख आमदार डॉ.संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, आमदार अंबादास दानवे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पावसाळयामध्ये अधिक पाऊस पडूनही वितरण व्यवस्था आणि पाणी पुरवठा योजनेच्या अडचणी असल्याने ग्रामिण भागामध्ये टंचाईचा सामना नागरीकांना करावा लागतो. यामध्ये महिला मंडळीना मोठया प्रमाणात त्रास होतो. खासदार प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा जिल्हयातील शेगाव तालुक्यातील चिंचोली व 30 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, खामगाव तालुक्यातील घाटपूरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजन, मेहकर तालुक्यातील जानेफळ कळंबेश्व्र प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, बुलडाणा तालुक्यातील पाडळी व 5 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना या कामांना निधी मिळण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांच्यासह पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. यासाठी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावाही केला.
मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी याबाबत यंत्रणेला सुचना केल्या होत्या. त्यानुसार आज 5 जानेवारी 2022 रोजी मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीत उपरोक्त् योजनांच्या संदर्भात ठोस निर्णय घेण्यात आला. व जलजीवन मिशन अंतर्गत या योजनांच्या निधीला प्रत्यक्षात मंजुरातही देण्यात आली. यामध्ये शेगाव तालुक्यातील चिंचोली व 30 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, (88 कोटी 35 लाख्) खामगाव तालुक्यातील घाटपूरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना(18 कोटी 78 लाख्), मेहकर तालुक्यातील जानेफळ कळंबेश्व्र प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (10 कोटी), बुलडाणा तालुक्यातील पाडळी व 5 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (16 कोटी 9 लाख्) असे तब्ब्ल 133 कोटी 22 लाखाच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
पाणी प्रश्नासाठी भरीव निधी दिल्याबददल मुख्यमंत्री यांचे आभार- खा. जाधव
चिंचोली सह पिंप्राळा, तित्रंव, वरुड, गव्हाण, तरोडा कसबा, जवळा पळसखेड, महागाव, जवळ बु. , वरखेड बु. , टाकळी नागझरी, नागझरी, उन्हाळखेड, हिंगणा वैजनाथ, गुही, वरखेड खुर्द, शिरजगाव निळे, जयपूर लांडे, खामगाव ग्रामिण, नायगाव खुर्द, नायगाव बु, कन्हारखेड, सवर्णा, पहुरजिरा, मोरगाव डिग्रस, लासुरा बु., लासुरा खुर्द, टाकळी विरो, टाकळी हट, खेर्डा, गौलखेड, तसेच पाडळी, गोंधनखेड, इजलापूर, मेरखेड, पळसखेड नागो, पळसखेड नाईक, यासह घाटपूरी व जानेफळ, कळंबेश्व्र या गावांचा पाणी प्रश्न् समुळ मिटण्यासाठी या योजनांचे मोठे योगदान राहणार आहे. ग्रामिण भागातील महत्वाचा हा पाणी प्रश्न् सोडविण्यासाठी भरीव निधी दिल्याबददल मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आभार मानले असुन लवकरच निविदा प्रकी्या पूर्ण होवून प्रत्यक्षात कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती खा.प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here