पिक विमा संदर्भात स्वाभिमानी आक्रमक..

0
262

पिक विमा संदर्भात स्वाभिमानी आक्रमक…

चिखली– प्रतिनिधी
जोरदार अतिवृष्टी झाल्याने चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.परंतु नुकसान होवुनही आजही अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासुन वंचीत असल्याने पिक विम्या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीचा निपटारा करण्यात यावा,उर्वरीत व कमी रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा करण्यात यावी,अशी मागणी स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी शेतकऱ्यांसह तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टि मुसळधार पावसामुळे नदिकाठच्या शेतजमीनी पिकासह पुराच्या पाण्याने खरडुन गेल्या होत्या शेतात पाणीच पाणी तुंबल्याने उडीद,मुंग,तुर त्याचप्रमाणे सततधार पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकास कोंब फुटल्याने अतोनात नुकसान तालुक्यात झाले होते.हि परीस्थीती लक्षात घेता प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2020-21अंतर्गत काढणी पश्चात व हंगामातील प्रतिकुल परीस्थीती यामुळे नुकसान झालेल्यांसाठी शासनाकडुन पिक विमा मंजुर करण्यात आला आहे.तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन शेतकरी हिताच्या दृष्टिने आंदोलने करण्यात आल्यामुळे हजारो शेतकर्याच्या खात्यावर विमा रक्कम मिळाला परंतु आजही चिखली तालुक्यातील अनेक शेतकरी विम्या पासुन वंचीत आहेत.काहिंना प्रमियम पेक्षा कमी रक्कम मिळाली आहे,नुकसानीची तक्रार सादर केली परंतु पैसे न खात्यावर जमा न होणे,अनेकांना सोयाबीन,उडीद,मुंग,तुर असा विमा काढला त्यांना एकाच पिकाचा विमा देण्यात आला,अर्ज करताना पासबुक,आधार कार्ड सोबत जोडले असतांना अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड चुकले असतांना त्या शेतकर्याच्या नावासमोर यादीमधे पैसे पेड दाखवण्यात आले आहे.नदिकाठच्या शेतकर्याचे अतोनात नूकसान होऊन देखील कमी पीक विमा रक्कम मिळणे यासह विविध प्रकारच्या असंख्य तक्रारी शेतकर्याकडुन प्राप्त होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात तालुका कृषी कार्यालय गाठुन शेतकरी व स्वाभिमानीने तालुका कृषी अधिकारी श्री अमोल शिंदे यांच्याकडे पिक विमा समस्यांचा पाढा वाचत पिक विमा कंपनी विरोधात कर्तव्यात कसुर केल्या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे.तर तालुक्यातील शेतकर्याच्या केलेल्या तक्रारीचा निपटारा करण्यात यावा,उर्वरीत व कमी रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा रक्कम जमा करावी,
शासन नियमांची अमलबजावनी न करणे,शेतकऱ्यांना वेठीस धरीत हेळसांड करणे,व प्रिमीयम पेक्षा कमी रक्कम देत फसवणुक करणे,व प्रशासनास वेळोवेळी दिशाभुल व चुकीची माहिती विमा कंपनीकडुन मिळत असल्याने विमा कंपनीवर शेतकर्याचे पैसे देण्याची जबाबदारी फिक्स करुण गुन्हे दाखल करण्यात यावे,अशी मागणी करण्यात आली आहे.तर प्रमुख मागण्यांची दखल न घेतल्यास कृषी कार्यालयासमोर दि13जानेवारी पासुन शेतकर्यासह बेमूदत ठिय्या आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.यावेळी विनायक सरनाईक,अनिल चौहाण,विलास तायडे,शुभम पाटिल,रवि टाले,सतिष सुरडकर,प्रसाद पाटिल,प्रल्हाद देव्हडे,भारत गाढवे,रामेश्वर चिकने,उमेश करवंदे,प्रकाश बनसोडे,आशु ,गणेश भोलाने,गणेश हाडे, अजय झोल,विष्णू हाडे,गणेश सोलाट यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते

पिक विम्याच्या समस्या सोडवण्यासाठी तालुका समिती,जिल्हा समिती शासनाकडुन नेमण्यात आली आहे.परंतु असंख्य तक्रारी विमा कंपनी विरोधात असुनही एका तक्रारीचा सुद्धा निपटारा समितीने केला नसल्याने हि समित करती तरी काय?असा सवाल शेतकर्यासह स्वाभिमानीने उपस्थीत केला आहे.

नुकसान होवुनही विमा कंपनीची डोळेझाक..शेतकर्याच्या बांधावर जात कृषी सहाय्यक,विमाप्रतिनीधी यांनी संयुक्त पंचनामे केले नुकसान झाले असल्याचे समोर आले परंतु तरी सुद्धा विमा कंपनी शेतकर्याचे हक्काचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत असुन शेतकर्याच्या मागण्यांकडे डोळेझाक करीत असल्याचे आरोप शेतकरी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here