जिल्हा मुख्यालयाची जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर… कोरोनाचे संकट मुख्यालयावर…..
बुलडाणा शहर हे जिल्हा मुख्यालयाच ठिकाण आहे. या मुख्यालयातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मुख्यालयातील प्रशासन कार्यालयाची जबाबदारी मात्र प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असल्याची बाब उघड झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय हे आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह संख्येवरून दिसून येत आहे
आज तब्बल 42 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची बाब उघड झाले असून त्यातील 21 रुग्ण हे बुलढाणा तालुक्यातील असल्याचं निष्पन्न झाला आहे बुलढाणा हे मुख्यालयाचे ठिकाण आहे या ठिकाणी कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत चालली असताना तो रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने उपाय योजना करणे गरजेचे आहे .अशावेळी जिल्हा प्रशासन काम करत असले जबाबदारी पार पाण्याची भूमिका प्रभारी अधिकाऱ्यांवर आली आहे जिल्हाधिकारी एस राममूर्ती हे सध्या रजेवर आहेत त्यांचा पदभार सध्या अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडे आहे
बुलढाण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडस हे ही 16 जानेवारीपर्यंत रजेवर गेले असून त्यांचा पदभार निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भागवत भुसारी यांच्याकडे आहे बुलढाणा चे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे (त्यांना सुट्टीवर राहणे अगत्याचं आहे परंतु प्रभावाची एकंदरीत चर्चा करताना) त्यांचाही पदभार अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्याकडे आहे बुलढाणा पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप साळुंखे हे सेवानिवृत्त झाल्यामुळे बुलढाणा पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार म्हणून श्री गिरीश ताथोड यांच्याकडे जबाबदारी आहे एकंदरीत बुलढाणा शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असतानाच या मुख्यालय ठिकाणी असलेले मुख्य कार्यालयाचा पदभार हा प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहे कोणतही काम करताना किंवा कारवाई किंवा निर्णय घेताना प्रभारी अधिकाऱ्यांना काही मर्यादा पडतात त्यामुळे जिल्हा मुख्यालयची धुरा प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असुन कोरोनाचे संकट जिल्हा मुख्यालयावर असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही….