विना मास्क फिरणाऱ्यांना नगरपालिकेचा दणका … सुरु झाली दंडात्मक कारवाई

0
102

*विना मास्क फिरणाऱ्यांना नगरपालिकेचा दणका ;* *सुरु झाली दंडात्मक कारवाई*

वारंवार सूचना देऊनही शहरात विना मास्क फिरणाऱ्या शंभरहून अधिक लोकांवर खामगाव नगरपालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. : बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे, त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत, शहरातील दुकानांना नियमांच्या अधीन राहून दुकाने उघडण्यास परवानगी दिली, त्यामुळे शहरात नागरिकांची गर्दी वाढू लागली. काही नागरिक बिनधास्तपणे फिरू लागले आहेत. सोशल डिस्टन्स पाळणे आणि मास्क लावणे याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. खामगाव शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने सकाळपासूनच विना मास्क शहरात येणार्‍या व फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. शिवाजी नगर पोलिसांची याकामी मदत घेतल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here