संदीपदादा शेळके महाउद्योजक पुरस्काराने सन्मानित

0
166

संदीपदादा शेळके महाउद्योजक पुरस्काराने सन्मानित

बुलडाणा : उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक संदीपदादा शेळके यांना नाशिक येथील नामांकित रिसिल कंपनीच्यावतीने ५ जानेवारी रोजी महाउद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नाशिक येथील रिसिल कंपनी रिसर्च, ब्रँडिंग, मीडिया, फिल्म्स क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीच्यावतीने उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा महाउद्योजक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी ग्रीन ऍग्रो बाजार कंपनीच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यात रोजगार निर्मितीचे मोलाचे काम केले. औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यात पोल्ट्री, डेअरी, बीजउत्पादन, कृषिपुरक व्यवसाय उभे केले. राजर्षी शाहू पतसंस्थेच्या रुपाने सहकारात उल्लेखनीय कामगिरी केली. महाराष्ट्र व मध्यप्रदेश हे संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. संस्थेच्या माध्यमातून तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विविध सामाजिक उपक्रम तसेच इतर व्यवसाय व नाविन्यपूर्ण संकल्पना राबवल्या जातात. संदीपदादा शेळके यांच्या नेतृत्वात संस्थेने शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक , कृषी , उद्योजकता क्षेत्रात फार मोठी भरारी घेतली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन नाशिक येथील रिसिल कंपनीच्या वतीने त्यांना महाउद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नाशिक येथील एम. एम. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मंगेश मोरे यांनी संदीपदादा शेळके यांचे जंगी स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here