तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय चा जयघोष करत महिलांनी मशाल रॅली काढून राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात दीपोत्सव साजरा केला
राष्ट्रमाता जिजाऊ जिजाऊंच्या 324 व्या जयंती निमित्त पूर्वसंध्येला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील जिजाऊंच्या जन्मस्थळी दीपोत्सव साजरा करण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आहे ती परंपरा कायम ठेवत जिजाऊंच्या लेकी नि…दहा हजार दिव्यांची आरासने राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यावर रोषणाई करण्यात आली…. राजवाड्या मध्ये शिवबा आणि मा जिजाऊंची रांगोळी रेखाटण्यात आली असून राजवाडा पण त्यांनी आणि विद्युत रोषणाईने उजळून टाकण्यात आला आहे सायंकाळी पासूनच जिजाऊ भक्तांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या दर्शन घेण्यासाठी राजवाडा परिसरामध्ये गर्दी केली होती