आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी केले निदर्शने*
: बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज शुक्रवारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी शेगावात सईबाई मोटे उपजिल्हा र रुग्नालयासमोर निदर्शने केली…: बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय मध्ये काम करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी , स्टाफ नर्स, फार्मासिस्ट यासह अशा सेविकांचे मागील ऑक्टोबर महिन्यापासून चे वेतन शासनाने अदा केले नाही. सेंट्रल नोडल प्रणाली लागू करण्याचे काम सुरू असल्याचे सांगून सदर वेतन थांबविल्याने कर्मचार्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. याशिवाय शेकडो वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेले कर्ज मुळे बँकेत लावण्यात येत असलेले धनादेश व ठेवले जात नसल्याने त्याचा आर्थिक भुर्दंडही कर्मचाऱ्यांना लागत असल्यामुळे कर्मचारी त्रस्त आहेत. यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज शुक्रवारी शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स फार्मसिस्ट यासह शहरातील आशा सेविकांनी रुग्णालयासमोर पगारासाठी निदर्शने केली यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांची भेट घेऊन पगारासाठी चे निवेदन यावेळी सादर केली.