बुलडाणा जिल्ह्यातील मोताळ्यात काँग्रेसला एकहाती सत्ता, संग्रामपुरात प्रहार ला मोठे यश, तर भाजप ला दोन्ही ठिकाणी भोपळा
: – बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 जागांकरिता आज 19 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर झालाय.. यावेळी विजयी उमेदवारांच्या वतीने गुलाल आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आलाय.. या दोन्ही नगर पंचायत मध्ये भाजप ला खाते ही उघडता आले नाही तर संग्रामपूर मध्ये प्रहार ला एकहाती सत्ता तर मोताळ्यात काँग्रेस ला एकहाती सत्ता मिळालीय..
बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायतीच्या 17 जागासाठी 64 उमेदवार निवडणूक रिंगणात होते, मोताळा नगर पंचायत मध्ये 12 काँग्रेचे उमेदवार विजयी झाल्याने सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस ला याठिकाणी एक हाती सत्ता मिळाली आहे .. तर भाजप ला खाते ही उघडता आले नसून सेना ला 4 जागा आणि राष्ट्रवादी ला एका जागेवर समाधान मानावे लागलेय.. तर
संग्रामपूर नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी 67 उमेदवार निवडणक रिंगणात होते … या ठिकाणी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने 12 ठिकाणी विजय मिळवत एक हाती सत्ता मिळविली असून महाविकास आघाडीला याठिकानि 5 जगावर समाधान मानावे लागलेय.. आणि भाजप ला याठिकाणी ही खाते उघडता आले नाहीय.. दोन्ही नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारवेळी राज्यमंत्री बच्चू कडू, यशोमती ठाकूर, अब्दुल सत्तार , नाना पटोले सह इतर नेत्यांचया सभा झाल्या होत्या, प्रत्येकाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती…मात्र आजच्या निकालाचे चित्र विचित्र पहायला मिळाले