बुलढाणा जिल्ह्यात होणार नाही शाळा सुरू… प्रशासनाने घेतला निर्णय

0
1209

बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे जोपर्यंत जिल्हास्तरावरून शासन निर्णय निर्गमित होत नाही तोपर्यंत जिल्ह्यात कुठे ही शाळा सुरू करू नये असा खुलासा बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे

राज्यांमध्ये येत्या 24 जानेवारीपासून 1ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू कराव्यात असे आदेश शासनस्तरावरून प्राप्त झाले आहेत त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे रुग्ण संख्येत वाढ होत आहे त्यामुळे 24 जानेवारीपासून जिल्हयात कुठेही शाळा सुरू न करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतलाय जोपर्यंत जिल्हास्तरावरून आदेश निर्गमित होत नाही तोपर्यंत जिल्ह्यात कुठेही शाळा सुरू करू नयेत अशा सूचना देण्यात आल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here