शेतकरी जीवनावर आधारित फास चित्रपट येतोय 4 फेब्रुवारीला…. आवश्यक पहा अविनाश कोलते
शेतकऱ्यांच्या वास्तव परिस्थितीवर व शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणारा ‘फास’ हा मराठी चित्रपट 4 फेबु. 2022 पासून संपूर्ण राज्यात एकाच वेळी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अशी माहिती निर्माते माहेश्वरी पाटील, डायरेक्टर अविनाश कोलते यांनी बुलढाणा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली
शेतकरी नैसर्गिक आपत्तींना सामोरे जात आपल्या कुटुंबासाठी मनात असलेल्या भावना प्रत्यक्षात आणू शकत नाही परंतु एक दिवस मनातील सर्व भावना प्रत्यक्षात आणून त्यांच्या मनावरील फास मधून स्वतःची मुक्तता करून घेतो अशा आशयाची कथा चित्रपटाची असून ग्रामीण शेतकरी कुटुंबाच्या वास्तव जीवनावर आधारित हा चित्रपट असल्याची माहिती डायरेक्टर अविनाश कोलते यांनी बुलढाणा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला अभिनेते कमलेश सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर या पत्रकार परिषदेला उपस्थित होते