बनावट विध्यार्थी दाखवून शिष्यवृत्तीचा अपहार…
बनावट विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्ती हडप केल्याचा प्रकार उघड इाल्यानंतर संबधीत शाळेने शिष्यवृत्तीचे पेसे शासन दरबारी जमा केल्यानंतर संबंधित मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यासंदर्भात संस्था व शाळेकडून नाव देण्यास टाळाटाळ होत असून, त्याला अधिकारीही पाठीशी घालत असल्याचा आरोप एका तक्रारकर्त्यांनी केला आहे…
खामगाव तालुक्यातील वर्णा येथील संत गुलाब बाबा विद्यालयामध्ये सत्र 11/12 मध्ये शाळेत प्रवेशित नसलेल्या मुलींना प्रवेशित दाखवून शिष्यवृत्तीचा अपहार केल्याची तक्रार संजय राऊत यांनी केली होती त्यावरून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी चौकशी केली असता सदर शाळेने बनावट विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्ती घेतल्याचे निप्पन्नी झाले होते त्यावरून प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण यांनी शिष्यवृत्तीचा अपहार करणाऱ्या संबंधित मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांना दिले आहेत, मात्र शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून अद्यापही तत्कालीन मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांची नावे देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे आता तत्कालीन मुख्याध्यापकासह नावे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विद्यमान मुख्याध्यापकांवर देखील कारवाई करावी असे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आले आहेत… तर सदर शाळेला तत्कालीन दोषी कर्मचाऱ्यांची नावे मागवण्यात आली असून, लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी सांगितले आहे…