*जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणूकसाठीचे प्रभाग निहाय प्रसारीत होणारे नकाशे चुकीचे …. विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन*
बुलडाणा, दि.10 : सद्यस्थितीत जिप व पंचायत समिती निवडणूकीसाठीची प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र अद्याप कोणतीही प्रभाग रचना राज्य निवणूक आयोगाने मान्य केलेली नाही. असे असतानाही सोशल मिडीया तसेच ईतर माध्यमातुन बुलडाणा तालुक्याच्या प्रभाग रचनेच्या संबंधित विविध नकाशे प्रसारित होत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठीची प्रभाग रचना करण्याचा कार्यक्रम अंतिमरित्या मान्य झालेला नाही.
प्रभाग रचना निवडणूक आयोगाने मान्य केल्या नंतर तहसिल कार्यालया मार्फत प्रसिध्द करण्यात येते. काही आक्षेप किंवा हरकत असल्यास त्या दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वेळ देण्यात येतो. त्या संदर्भातील कायदेशीर कार्यवाही राज्य निवडणूक आयोगा मार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे अनाधिकृत रित्या प्रसारीत होणारे विविध नकाशे हे खाजगी व्यक्तींनी अंदाजीत आधारावर तयार केलेले असावेत. प्रभाग रचनेचा कोणताही नकाशा, माहिती तहसिल कार्यालयाने प्रसिध्द केलेली नाही. प्रसारीत होणारे विविध नकाशे , माहिती यांच्याशी निवडणूक विभागाचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे या संदर्भात प्रसारीत होणारी माहीती ही चुकीची असल्यामुळे त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसिलदार रूपेश खंडारे यांनी केले आहे.