दोनशे रुपयाची लाच घेतांना लिपीकाला अटक…
चिखली येथील प्रथमवर्ग न्यायालयातील एका प्रकरणातील सुनावणीच्या नकला देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच मागणाऱ्या आणि त्यापैकी दोनशे रुपये स्वीकारणाऱ्या वरिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे…
चिखली येथील एका व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारी वरून, चिखली येथील प्रथमवर्ग न्यायालयात विवाहितेच्या छळा संदर्भातील एक प्रकरण सुरू आहे, या प्रकरणात सुनावणीच्या नकला देण्यासाठी आरोपी सुनील बळीराम महाजन यांनी पाचशे रुपयांची लाच मागितली होती, त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पडताळणी करून सापळा रचला, तेव्हा ठरलेल्या पाचशे रुपयांपैकी दोनशे रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिखली येथे आरोपी सुनील महाजन यास पंचासमक्ष रंगेहात पकडले आहे… या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर चिखली पोलीस स्टेशन मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे…