आम्हीच भाजपाला महाराष्ट्रात हिंदुत्व शिकवलं …. शिवसेना खासदार प्रतापराव जाधव

0
109

आम्हीच भाजपाला महाराष्ट्रात हिंदुत्व शिकवलं …. शिवसेना खासदार प्रतापराव जाधव

बुलडाणा प्रतिनिधी

भाजपवाल्यांनी आम्हाला हिंदुत्वाचे डोस पाजू नये प्रखर हिंदुत्ववादी भूमिका शिवसेनेनेच पूर्वीपासून घेतली आहे महाराष्ट्रात भाजपाला शिवसेनेने हिंदुत्व शिकवले. भाजपाच हिंदुत्व किती मवाळ आणि राजकारणा पुरत होतं हे जानतेला चांगलं ठाऊक आहे .हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना दोन हात करायला तयार आहे असे खुले आवाहन शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी भाजपाला दिलयं ….

महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये एम आय एम सहभागी होणार असल्याच्या चर्चेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्याप्रमाणात वादंग निर्माण झालं आणि भाजपाने शिवसेनाच्या हिंदुत्ववर प्रश्नचिन्ह निर्माण केलं भाजपा नेत्यांनी शिवसेनेलावर जहरीली टीका केल्यानंतर शिवसेनेने सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे भाजपाने केलेल्या टीकेला शिवसेना नेते प्रत्युत्तर देत आहेत भाजपा ने आम्हाला हिंदुत्व शिकून आहे सत्तेसाठी नितीश कुमार, मेहबूबा मुक्ती यांच्यासोबत भाजपाने हातमिळवणी करून सत्तेत सहभाग घेतला त्यावेळेस त्यांचं हिंदुत्व कुठे गेलं होतं असा प्रतिप्रश्न शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी उपस्थित करून हिंदुत्व पाजळून पहा कोणाच्या हिंदुत्वाला किती धार आहे यासाठी भाजपासोबत दोन हात करण्याची तयारी शिवसेनेची असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here