भाऊ तुमच्यामुळेच शक्य झालंय…. आज उपाध्यक्ष पदातून मुक्त होतेयं …आपली आभायाऐवढी माया अशीच राहु द्या….अशी कृतज्ञ भावना बुलडाणा जिल्ह्याची शिवसेनाप्रमुख जालींदर बुधवत यांनी खासदार प्रतापराव जाधव यांचा सत्कार करून व्यक्त केली… महाराष्ट्रात महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय वर्तुळाला कलाटणी मिळाली आणि बुलढाणा जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी झाल्यामुळे शिवसेनेला पहिल्यांदा जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत सहभागी होता आलं यावेळी उपाध्यक्ष पद शिवसेनेच्या वाट्याला आलं आणि उपाध्यक्षपदी जिल्हा शिवसेना प्रमुख जालींदर बुधवत यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य कमलताई बुधवत या उपाध्यक्षपदी विराजमान झाल्यात. जवळपास दोन वर्षे त्यांना काम करण्याची संधी जिल्हा परिषदेमध्ये मिळाली दरम्यान सर्वत्र कोरोनाचे संकट असताना आरोग्य विभागाची जबाबदारी ही त्यांच्यावरच होती संकट काळात ही न डगमगता आपलं काम त्यांनी सुरूच ठेवलं आरोग्यसेवा सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासकीय स्तरावर त्यांचे योगदान महत्त्वाचं ठरलं व जिल्हा परिषदेच्या प्रशासनात एक आगळी वेगळी कर्तुत्व आणि नेतृत्व देणारी छबि त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून दाखवून दिली आज 20 मार्चला बुलढाणा जिल्हा परिषदेचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते यांनी जबाबदारी स्वीकारली त्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी सदस्य यांचे अधिकार संपुष्टात आले… अधिकार संपुष्टात आल्यानंतर जिल्हा परिषदेकडून मिळालेली गाडी त्यांनी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद प्रशासनाच्या स्वाधीन केली तर दुपारी खासदार प्रतापराव जाधव हे बुलडाणा येथे आले असताना जिल्हा शिवसेना प्रमुख जालींदर बुधवत यांनी आज जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात आला ..उपाध्यक्ष होण्याचा बहुमान हा तुमच्यामुळेच शिवसेना कार्यकर्त्याला मिळाला … असा कृतज्ञ भाव व्यक्त करत खासदार प्रतापराव जाधव यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला….. राजकारणात एखाद्या व्यक्तीला सर्वोच्च पद मिळालं तर हे पद मिळवण्यासाठी आपणास किती श्रम करावे लागले व हे पद आपण कसे मिळवले हे गोडवे तो इतरांना सांगत असतो … हेच पद देण्यासाठी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्या राजकीय गुरूला ही विसरूल्या जातं असे एक नाही अनेक उदाहरणे आपणास समाजात दिसून येतात परंतु जालींदर बुधवत या वृत्तीला अपवाद ठरले…. त्यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यामुळेच उपाध्यक्ष पद मिळालं पद गेल्यावर ही खासदार प्रतापराव जाधव यांची कृतज्ञता व्यक्त त्यांच्या प्रती असलेला आदर भाव या सत्कार समारंभाच्या निमित्ताने व्यक्त केला आहे
भारत निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 20 नोव्हेबर 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान करावे. यासाठी मतदारांनी...
बुलढाणा ( प्रतिनिधी )
देशातील आरोग्य सेवेत सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मध्ये समन्वय असणे गरजेचे आहे येणाऱ्या काळात देशातील जनतेला चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी...
बुलढाणा ( प्रतिनिधी )सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट " ब " या संवर्गातील रिक्त पदांवर नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत...