राज्य सरकारमुळेच विज संकट…केद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे …
योग्य नियोजन नसल्याने राज्यात विजसंकट निर्माण झालंय यास राज्य सरकार जबाबदार आहे असं मत केंद्रीय रेल्वे तथा कोळसा खदान राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत केलं आहे
ते पुढे म्हणाले की राज्यत वीज संकट निर्माण झाले आहे या संकटाला राज्य सरकार जबाबदार आहेत काल सरकारच्या मं>यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्राने आम्हाला कोळसा खरेदीची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे मी कोळसा मंत्री म्हणून राज्य सरकारला परवानगी द्यायला तयार आहेत त्यांनी बाहेरून कोळसा विकत घ्यावा आणि राज्याला वीज संकटापासून वाचवा असे खुले आव्हान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुलडाणा येथे पत्रकार परिषदेत केले तसेच राज्यसरकारकडे केंद्राचे 3 हजार कोटी थकीत असतानाही आम्ही कोळसा द्यायला तयार आहेत असे ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला निंदनीय प्रकार असून कोणत्याही नेत्याच्या घरावर असा हल्ला करणे योग्य नसल्याचे सांगून भाजपा त्याचं समर्थन कदापीच करणार नाही असे ते म्हणाले
राज्यातील मविआ सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरलं असून हे अमर अकबर एंथोनी च सरकार आहे , यात शिवसेना कधीच अकबर झाली असून आता शिवसेनेनं गीता पठण करण्याऐवजी नमाज पठणाचे वर्ग घ्यावेत अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुलढाणा येथे केली आहे , आज दानवे बुलढाणा लोकसभा मतदार संघात भाजपाच्या आढावा बैठकी नंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.