महाकवी वामनदादा कर्डक यांचे पहीले राज्यस्तरीय साहित्य संमेलन बुलडाणा येथे होणार*

0
114

महाकवी ,गीतकार वामनदादा कर्डक यांचे पहीले राज्यस्तरीय साहित्य संमेलन बुलडाणा येथे होणर

An      – महाकवी, गीतकार वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २३ एप्रिल रोजी बुलडाणा येथे महाकवी वामदादा कर्डक राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या एक दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कवी, लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याहस्ते केले जाणार असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी १७ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मुंबईतील साहित्यिक अर्जून डांगळे राहणार आहेत. यावेळी मुख्य निमंत्रक मंत्रालयीन सचिव सिद्धार्थ खरात, प्रसिद्ध साहित्यिक प्रा. सदानंद देशमुख, कार्याध्यक्ष माजी जि. प. सभापती दिलीप जाधव व स्वागताध्यक्ष स्वत: रविकांत तुपकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, टॉक शो, निमंत्रितांचे कविसंमेलन असे चार सत्र होणार असून त्यानंतर समारोपीय सत्र व सायंकाळी ही रात्र शाहीरांची हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती यावेळी रविकांत तुपकर यांनी दिली. वामनदादांच्या नावाने घेतले जाणारे हे राज्यातील पहिलेच साहित्यसंमलेन असून हे संमेलन ऐतिहासीक ठरेल, असा विश्वासही यावेळी स्वागताध्यक्ष रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here