*नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील मेहकर गावाजवळ खाजगी ट्रॅव्हल्स आणि ऑटो चा भीषण अपघात 3 जागीच ठार तर 2 गंभीर*
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर गावातून जाणार्या नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गा वरील खंडाळा देवी गावाजवळ खासगी ट्रॅव्हल्स व अल्टो कार या मध्ये भीषण अपघात होऊन या अपघातात अल्टो कार मधील तीन जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाले आहे
आज 23 एप्रीलच्या सकळच्या नागपुर-मुंबई हायवेवर सकाळी 3.00 च्या सुमारास चिंतामणी (सनी नागपूर) ट्रॅव्हल्स गाडी क्रमांक MH 40 BL 7061 व अल्टोकार गाडी क्रमांक MH 06 W 5134 यांची समोरासमोर धडक झाली अल्टो कार मध्ये 5 व्यक्ती असुन 3 जणांचा जागीच मृत्यू झाला 2 जण गंभीर जखमी आहे
अल्टो कार ही चाळीसगाव येथील आहे ती डिग्रस येथे साखरपुडा समारंभा साठी जात असतांना हा अपघात झाला आहे अल्टोकार मधील इंदल चव्हाण वय 38 वर्षे, योगेश विसपुते वय 24 वर्षे , विशाल विसपुते वय 34 वर्षे अशी मुत्यु झालेल्या व्यक्तीचे नावे आहेत तर त्या गाडीमधील ज्ञानेश्वर रघुनाथ चव्हाण वय 32 /(ड्रायव्हर) मिथुन रमेश चव्हाण वय 17 वर्षे हे जखमी असुन यांना बुलढाणा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले
चिंतामणी ( सनी नागपूर) ही नागपूर येथुन पुणे येथे जातांना हा अपघात झाला या अपघातातील जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे