जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती रँली आणि विद्यार्थिनींनी सादर केले पथनाट्य ……
बुलडाणा = 25 एप्रिल हा जागतिक हिवताप दिन…. या दिनाचे औचित्य साधून बुलढाणा येथील हिवताप कार्यालयाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं
हिवताप हा मुख्यत्वे फॉल्सिकेरम व व्हायवॅक्स या पॅरासाइटमुळे निर्माण होतो. व या पॅरासाइटची निर्मीती दलदलीच्या आणि अस्वच्छतेच्या ठिकाणी होते.. डासाचा किंवा मच्छरांची पैदास थांबण्याच्या दृष्टिकोनातून अडगळीच्या ठिकाणाचे पाणी साठे स्वच्छ करणे हप्त्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे या दृष्टिकोनातून जनजागृती करण्यासाठी जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने बुलडाणा शहरातून जनजगृती रॅली काढण्यात आली. या रॅलीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस यांनी हिरवी झेंडी दाखविली शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत या रॅलीचा समारोप पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला दरम्यान नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पथनाट्ये सादर केली… जिल्हा हिवताप कार्यालय येथे आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम राठोड सांगळे,जिल्हा शल्यचिकित्सक. नितीन तडस, जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चौहान तसेच आरोग्य कर्मचारी आशा सेविका व विद्यार्थिनी उपस्थित होते…