महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण संपन्न
अँकर – महाराष्ट्र दिनाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त बुलडाणा येथील पोलीस कवायत मैदानावर आज 1मे ला राज्याचे अन्न व औषध प्रसाशनमंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिगणे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झाले .यावेळी पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली आहे . शिवाय पोलीस दलामध्ये नव्याने सहभागी झालेल्या 29 नवीन पोलीस वाहनांनी सुद्धा संचलन केले वाहतुकीचे नियम पाळा संदर्भातील माहिती देणाऱ्या पुस्तिकाचे विमोचन यावेळी करण्यात आले तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते झाले