*कामगार दिनानिमित्त बुलढाण्यात आली बाईक रॅली आणि कामगारांना वाटप करण्यात आली सुरक्षा किट
…
:*बुलडाणा* – एक मे कामगार दिन त्यानिमित्त बुलडाणा जिल्हा मजदूर संघाच्या वतीने आज 1 मे ला बाईक रॅली काढण्यात आली या कामगार रॅलीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखविण्यात आली
शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत या रॅलीचा समारोप पुन्हा मजूर कामगार संघटनेच्या कार्यालयासमोर झाला या रॅलीमध्ये बुलडाणा शहरातील विविध क्षेत्रात काम करणारे या कामगार रॅलीत सहभागी झाले होते
तत्पूर्वी मजूर कामगारांना कामगार सुरक्षा पेटीच वितरण यावेळी करण्यात आले शिवाय सरकारतर्फे कामगार मजुरांसाठी देण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी मजूर कामगारांना देण्यात आली….