सागर कृषी केंद्राचा परवाना रद्द… आज दुकान सील होण्याची शक्यता ?…. कारवाई करण्यास कुचराई करणाऱ्या कृषी अधिकाऱ्याला शो कॉज नोटीस….
बुलडाणा (प्रतिनिधी )
कृषी अधिकाऱ्यांच्या समोरच शेतकऱ्यांची आर्थिक लुटीचा प्रकार उघड कारवाई शून्य या मथळ्याखाली बुलडाणा डेली न्यूज ने डीएपी खतासाठी कृषी केंद्र दुकानदार शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याची बातमी प्रकाशीत केली होती व या बातमीमध्ये कुंपणाने शेत खाल्ले तर दाद मागावी कोणाकडे असा काहीसा प्रकार तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याच्या सोबत घडल्याची इत्थंभूत बातमीव्दारे कृषी विभागाच्या हलगर्जीपणाचे लक्तरे बातमीच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली होते या बातमीची दखल घेत कृषी विभागाचे अधीक्षक नरेंद्र नाईक यांनी सागर कृषी केंद्राचा परवाना रद्द करून आज या कृषी सेवा केंद्राला सील लावण्यात येण्याची शक्यता आहे तालुका कृषी अधिकारी दिनकर मेरत यांच्यासमक्ष हा प्रकार घडलाय त्यांनीच या कृषी केंद्र चालकाविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करणे अपेक्षित होते परंतु त्यांनी कारवाई करण्यास टाळाटाळ करुन कुचराई केल्याप्रकरणी कृषी विभागाच्या या अधिकाऱ्याला शोकॉज नोटीस बजावण्यात आली आहे.. पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असताना या प्रकाराला कृषी विभागाने गांभीर्याने घेणे गरजेचं होतं परंतु तसं तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून झालं नाही याप्रकरणाची दखल शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि काही संघटनांनी घेतली तर झालेला प्रकार हा मंत्रालयापर्यंत पोहल्याने या प्रकरणी तात्काळ कारवाई करणे कृषी विभागाला भाग पडले….