0
215

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीसंपन्न….नियोजनाचा अभाव…तुम्हारे खत मे हमारा सलाम….काहीनी बॅनर लावुन केले फोटोसेशन..

बुलडाणा : आजादी का अमृत महोत्सवी वर्षाचा एक भाग म्हणून आज 3 जून जागतिक सायकल दिनानिमीत्य बुलडाणा येथे सायकल रॅलीचे आयोजन नेहरू युवा केंद्राच्या वतीने करण्यात आले होते. बुलढाणा शहरातील जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलच्या मैदानावर सकाळी या रँलीला बुलडाणा आमदार संजय गायकवाड यांनी हस्ते हिरवी दाखवली. यावेळी जिल्हाधिकारी रामामुर्ती ,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी डॉ.अनिता राठोड उपस्थितीत होत्या 13 देशात सायकलव्दारे भ्रमंती करणारे आंतरराष्ट्रीय सायकलपटू संजय मयुरे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .या सायकल रॅलीमध्ये आमदार संजय गायकवाड आंतरराष्ट्रीय सायकल खेळाडू संजय मयुरे यांच्यासह लहानांपासून तर थोरांपर्यंत सायकलपटु सहभागी झाले होते

नियोजनाचा अभाव 

जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नेहरु युवा केंद्रासह प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते या रॅलीमध्ये लहानांपासून तर थोरांपर्यंत आणि प्रतिष्ठित सायकलपटू सहभागी झाले होते आयोजकांच्या वतीने क्रीडा विभाग या रॅलीचे संचलित करत असतांना योग्य नियोजन नसल्यामुळे आमदार महोदय यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ही सायकलपटु ताटकळत उभेच राहीले.. हा प्रकार पाहुन मंचावरील मान्यवरांही विचारत पडले अखेर.. सायकल रॅली सुरु झाली अशी सूचना द्यावी लागली …. मान्यवर येण्यापुर्वी एका लाईनमध्ये सर्व सायकल खेळाडूंना उभे करण्यात आले होत्या. त्यांना तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या की चार,चारच्या रो मध्ये सायकलपटुनी निघायचे आहे. रो ची सिमा निर्धारीत नव्हती पहिला रो कुठपर्यंत याबद्दलही सायकल खेळाडू अनभिन्न असल्यामुळे हा गोंधळ उडाला होता….

तुम्हारे खत मे हमारा सलाम….काहीनी बॅनर लावुन केले फोटोसेशन…
जागतिक सायकल दिन हा साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्या होत्या त्यानुसार नेहरू युवा केंद्राचे आयोजित केलेल्या या सायकल रॅलीमध्ये हजेरी लावुन त्याठिकाणी आपल्या कार्यालयाचा ,संस्थेचा, प्रतिष्ठानचा बॅनर आणून उपस्थित सायकल रॅलीत उभे राहून हा कार्यक्रम आपणच आयोजित केला आहे या आर्वीभावात फोटो कादुन घेतले. या फोटोचा उपयोग आपल्या वारिष्ठांना दाखविण्यासाठी किवा माध्यमाच्या प्रतिनिधी बातमी छापुन घेण्यासाठी होऊ शकतो …. कार्यक्रमस्थळी असलेल्या एका ज्येष्ठ पत्रकारांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी फोटोसेशन करणाऱ्या काही व्यक्तींना खडे बोल सुनावले तुम्हारे खात मे हमारा सलाम चालू द्या….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here