विठ्ठलाच्या दर्शनासठी गजानन महाराजांची पालखी पंढरपुरकडे मार्गस्थ …
शेगाव : श्री हरीविठ्ठल, जयहरी विठ्ठल गण गण गणात बोत‘च्या नामगजरात बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी ६ जून रोजी सकाळी 6=30 वाजता मोठ्या थाटात विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली पालखीचे हे ५३ वे वर्ष असून, गज अश्वासह शेकडो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. श्रींची पालखी अकोला,, पातूर, रिसोड, परभणी, उस्मानाबाद, तूळजापूर, सोलापूर या मार्गाने एकूण ७५० किलोमिटर प्रवास करून आषाढ शु-९ शुक्रवार दि. ०८ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामास पोहचणार आहे…
: आषाढी एकादशी च्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील शेकडो पालख्या दरवर्षी पंढरपुरात दाखल होतात. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षात शासनाच्या आदेशामुळे पालख्या पंढरपुरात गेल्या नव्हत्या मात्र आता कोरोना गेल्यामुळे पुन्हा ह्या पालख्या विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्त होत आहे. यामध्ये विदर्भातुन सर्वात मोठी दिंडी हि शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानची असल्याचा नावलौकिक आहे.