मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमूलकर यांनी आपल्या व्हाट्सप डीपी वर एकनाथ शिंदे यांच्या फोटो लावून आपला पाठिंबा जाहीर केलाय?
Anc : विधान परिषद निवडणुकांचे निकाल हाती येताच शिवसेनेच्या एका गटाने दगाफटका केला की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.. शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आमदार सुद्धा सुरत येथील एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत… त्यामुळे एकंदरीतच महाविकास आघाडी सरकार पडते की काय ? अशी परिस्थिती सद्या निर्माण झाली आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर चे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी आपल्या व्हाट्सअप डीपी वर एकनाथ शिंदे यांचा फोटो लावून आपला पाठिंबा एकनाथ शिंदे यांना जाहीर केलाय.. त्यामुळे एकंदरीतच येणाऱ्या काही तासात ज्या घडामोडी घडतील त्यातून संपूर्ण चित्र स्पष्ट होईलच… मात्र बुलढाणा जिल्ह्यातील ही मोठी बातमी म्हणावी लागेल.. शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी आपल्या व्हाट्सअप डीपी वर एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला त्यामुळे त्यांनी उघड उघड पाठिंबा जाहीर केलाय का ? असा प्रश्न आता विचारला जातोय.. त्यामुळे एकंदरीतच अजून किती आमदार एकनाथ शिंदे सोबत त्या ठिकाणी आहेत ? ते काही वेळात उघड होईलच.. मात्र संजय रायमुलकर मेकर शिवसेना आमदार यांनी मात्र आपला पाठिंबा जाहीर केल्याने शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ माजली आहे..