*अंगावर लोखंडी गेट पडल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू.*
बुलडाणा – शाळेचे लोखंडी गेट अंगावर पडल्याने एका 8 वर्षीय आदिवासी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुलढाणा शहरा नजीकच्या आदिवासी आश्रम शाळेत आज 16 जुलै च्या सकाळी 11=30 वाजता घडली
येळगाव येथील आश्रम शाळेतील विद्यार्थी रोशन रमेश दुबे हा शाळा सुटल्यानंतर आपल्या मित्रासमवेत खेळत असताना आश्रम शाळेच्या आवारातील शाळेचे गेट या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडले त्यानंतर आश्रम शाळेचे अधीक्षक अंकुश जाधव व राजेश राठोड यांनी सदर बालकाला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता आणले परंतु डॉक्टरांनी सदरहू बालकाला मृत घोषित केले याप्रकरणी बुलडाणा पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मूर्तीची नोंद करण्यात आली आहे