लाठी खावू गोळी खावू, मात्र विदर्भ राज्य मिळवून घेवू.. विदर्भ आंदोलन समिती विधान मंडळावर करणार हल्लाबोल
बुलडाणा (प्रातिनिधी)
विदर्भाची मागणी कायम निकाली काढण्याच्या दृष्टिने विदर्भ मिळवू या मागणीची पुर्तता करण्याकरीता लाठी खाऊ गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेवू, असा निर्धार व्यक्त करत आता आरपारच्या लढाईची सुरुवात १९ डिसेंबर रोजी होणार असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळावर “हल्लाबोल आंदोलन” केले जाणार आहे…
“शुरु हुई है जंग हमारी, लढेंगे जितेंगे” या इर्षेने हे आंदोलन आता तीव्र केले जाणार आहे… विदर्भातील खासदारांचे राजीनामे मागण्याच्या केलेला प्रयोग विदर्भातील जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा ठरला असून हल्लाबोल आंदोलनात १० हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत ..