*व्हाईस ऑफ मीडियाची रविवारी बुलढाण्यात राज्यस्तरीय कार्यशाळा*
बुलडाणा, दि. लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा हे ब्रीदवाक्य असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या राष्ट्रीय संघटनेची राज्यस्तरीय कार्यशाळा रविवारी दि. 25 रोजी बुलढाण्यात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला राज्यभरात सह जिल्ह्यातील संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत जिल्ह्यातील व्हाइस ऑफ मीडियाच्या सर्व सदस्यांना दहा लाखांचे विमा कवच प्रदान करण्यात येणार आहे.
बुलडाणा येथील चिखली मार्गावरील हॉटेल नर्मदा रेसिडेन्सी या ठिकाणी सकाळी दहा वाजता या कार्यशाळेला सुरुवात होईल.
या कार्यशाळेमध्ये प्रख्यात लेखक तथा विचारवंत डॉ. यशवंत मनोहर व औरंगाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक जयदेव डोळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. संस्थापक अध्यक्ष तथा सकाळ मीडियाचे संपादक संदीप काळे, व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य अध्यक्ष राजा माने, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुक्ती हारून अ. कादिर, महिला प्रदेशाध्यक्ष शैलजा जोगल, उपाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील, विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक, राज्य संघटक सुधीरचे चेके पाटील यावेळी मार्गदर्शन करून संघटनेची पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत. मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष नरेश होळणार, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अभय देशमुख, महिला राज्य उपाध्यक्ष यास्मिन शेख, परवेज खान, प्रशांत माने, संघटनेच्या कार्यालयीन चिटणीस दिव्या पाटील यावेळी उपस्थित राहतील.
दोन सत्रात होणाऱ्या या कार्यशाळेत बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी प्रथमच मीडिया ची एकंदर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थिती या क्षेत्रातील आव्हाने व सकारात्मक पत्रकारितेसाठी नवनवीन मार्गदर्शन व माहिती मिळणार आहे.
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
बुलढाणा येथील पत्रकार भवनासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार संजय गायकवाड यांचा संघटनेच्या केंद्रीय व राज्यस्तरीय मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार केला जाणार आहे.