बुलडाणा ( प्रतिनिधी ) राजस्थान मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ठीकठकणी भारतीय जनता पक्षाच्यावतीने कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी ढोल ताशाच्या निनादात जल्लोष केला. यावेळी फटाक्याची आतिशबाजी करण्यात आली. महिलांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. लोकांना पेढे वाटण्यात आले. यावेळी भाजपचे नेत्यांसह अनेक पदाधिकारी या विजय उत्सवात सहभागी झाले होते.