चिखली येथील एस पी एम कॉलेजमध्ये जागतिक एड्स दिनानिमित्त जागरण आणि निबंध स्पर्धा

0
25

चिखली
जागतिक एड्स दिनानिमित्य एस पी एम तात्यासाहेब महाजन कला आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने समुपदेशक भावना कॅम्बल मार्गदर्शन कार्यक्रम आयोजन करण्यात आल होत यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष गव्हाणे अध्यक्ष स्थानी, प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून भावना कॅम्बेल, विलास गवळी, महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब चे प्रमुख आणि रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुरेश माळशिखरे आणि डॉ. केदार ठोसर तसेच राष्ट्रीय सेवा योजना तालुका समन्वयक डॉ. नागेश गायकवाड उपस्थित होते.या
जागरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन बरांडे तर आभार प्रदर्शन विजय गवई यांनी केले. प्रास्ताविक करताना डॉ. ठोसर यांनी जागतिक एड्स दिन पाळण्यामागची भूमिका सांगितली, तसेच यानिमित्ताने महाविद्यालयात एड्स चे धोके, त्यासाठी घेण्याची पूर्व काळजी याबाबत निबंध स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती दिली.
प्रमुख वक्त्या भावना कॅम्बेल यांनी मागील काही वर्षात कमी झालेला एच आय व्ही संसर्गाचा धोका आणि त्यातून एड्सची लागण होणे याचे प्रमाण मोबाईल क्रांतीनंतर आता पुन्हा वाढला आहे असे प्रतिपादन केले. नवीन पिढी अर्धवट माहितीच्या आधारावर ‘क्या होता करके तो देख’ या विचाराने चुकीचे कृत्य करत आहेत तसेच समूह जीवनामध्ये आणि एकत्रीकरणांमध्ये पुरेशी पवित्रता ठेवली जात नसल्यामुळे प्रौढ व्यक्ती सुद्धा आता अधिक प्रमाणात संसर्गग्रस्त होत आहेत असा धोक्याचा इशारा ही त्यांनी दिला. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षीचे निश्चित केलेले बोधवाक्य ‘आता नेतृत्व व आघाडी समुदायाची’ हे युवकच सार्थ करू शकतात. त्या दृष्टीने याआधी प्रमाणेच एस पी एम च्या विद्यार्थ्यांनी काम करावे आणि रेड रिबन क्लब ने याचे नेतृत्व करावे असे आवाहन त्यांनी केले.उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना त्यांनी एड्स मुक्ती साठी काम करण्याची शपथ दिली.
अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ गव्हाणे यांनी भारतीय जीवन पद्धती, संयमाचे महत्त्व सांगतानाच एस पी एम कॉलेज विविध सामाजिक आणि आरोग्य संबंधित विषयांमध्ये सर्व शासकीय उपक्रमांना सहकार्य करेल आणि स्वतःचे जनजागरण कार्यक्रम सुद्धा आयोजित करेल असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here