- बुलडाणा :हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बुलढाणा शहरातील संगम चौकातील शिव स्मारकाच्या चबुतऱ्यावर स्थापित करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. स्वराज्य स्थापनेचं बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊंच जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच अश्वारूढ पुतळा बुलढाण्यात उभा राहायला आहे 18 पकड जातीतील दांपत्यांनीच महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची विधिवत पूजा केली त्यानंतर हा पुतळा तीन क्रेनच्या सहाय्याने शिवस्मारक समितीच्या चबुतऱ्यावर स्थापित करण्यात आला यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्यासह शिवस्मारक समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिवस्मारकाच्या परिसरामध्ये सुशोभीकरण विद्युत रोषणाई व रंगरंगोटीचे काम पूर्ण होऊन पुढच्या महिन्यामध्ये या पुतळ्याचा भव्य लोकांपर्यंत सोहळा घेणार असल्याची माहिती बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली… जिजाऊंच्या जन्मभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा अश्वारूढ पुतळा स्थापित झाल्याबद्दल प्रत्येक बुलढाणेकरांना अभिमान आहे…अभिमान आणि स्वाभिमान जगन ज्यांनी शिकवला असे छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकात विराजमान झाले आहेत..
Home आपला जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बुलडाणा येथे शिवस्मारकाच्या चबुतऱ्यावर स्थापित… क्रेनच्या सहकाऱ्यांने...